फ्रेंच ओपन: भारताचे रोहन बोपन्ना आणि त्याचा डच साथीदार मॅटवे मिडेलकूप आज पुरुष युगल सेमीफायनल सामना खेळणार. बोपन्ना- मिडलकूप यांचा सामना नेदरलँड्सचा एल साल्वाडोरच्या जीन ज्युलियन रॉजर आणि मार्सेलो अरेव्हालो यांच्याशी होईल.
महिला दुहेरीत, सानिया मिर्झा आणि तिची चेक जोडीदार लुसी ह्रडेका यांना तिसऱ्या फेरीत कोको गॉफ आणि जेसिका पेगुला या अमेरिकन जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
भारताच्या रोहन बोपन्नाने मंगळवारी त्याचा नेदरलँडचा साथीदार मॅटवे मिडलकूपसह फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला. बोपन्नाने दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी त्याने 2015 च्या विम्बल्डन स्पर्धेतही उपांत्य फेरी गाठली होती. बोपन्ना आणि मिडलकप यांनी कोर्ट सायमन मॅथ्यू येथे उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनच्या लॉयड ग्लासपूल आणि फिनलंडच्या हेन्री हेलिओव्हारा यांचा पराभव केला. पॅरिसमध्ये दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या सामन्यात बोपन्ना-मिडलकप जोडीने ग्लासपूल आणि हेलिओवारा जोडीचा 4-6, 6-4, 7-6(3) असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत बोपण्णा आणि मिडलकूप यांचा सामना नेदरलँडच्या जीन ज्युलियन रॉजर आणि एल साल्वाडोरच्या मार्सेलो अरेव्हालो यांच्याशी होईल.