कर्णधार हरमनप्रीतने दोन वेळा गोल केल्याने भारताने बेल्जियमचा 5-1 असा धुव्वा उडवला आणि आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) प्रो लीगच्या युरोपियन लेगमध्ये दोन पराभवानंतर पहिला विजय नोंदवला. मिडफिल्डर विवेक सागर प्रसादने पहिल्याच मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हरमनप्रीतने 20व्या आणि 29व्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर 3-0 केले. इतर गोल अमित रोहिदास (28वे मिनिट) आणि दिलप्रीत सिंग (59व्या मिनिटाला) यांनी केले.
बेल्जीयम कडून विलियम गिल्सन याने एकमेव गोल 45 व्या मिनिटात केले. युरोपियन लीगच्या आधी होम लेगमध्ये भारत अव्वल स्थानावर होता. युरोपियन टप्प्यात, 26 मे रोजी पहिल्या सामन्यात बेल्जियमकडून 1-2 आणि दुसऱ्या दिवशी ग्रेट ब्रिटनकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. आता भारतीय संघ शनिवारी ब्रिटनशी भिडणार आहे.