Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथनचा मार्सेल ग्रनॉलर्सवर सनसनाटी विजय

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथनचा मार्सेल ग्रनॉलर्सवर सनसनाटी विजय
पुणे , बुधवार, 2 जानेवारी 2019 (11:47 IST)
दुहेरीत रोहन बोपन्ना व दिवीज शरण या भारताच्या जोडीची आगेकूच
 
एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन याने दिमाखात  दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
 
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथने याने स्पेनच्या मार्सेल ग्रनॉलर्सचा 4-6, 6-4, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 1तास 57मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये मार्सेलने वर्चस्व राखत पहिल्या, तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस राखली व हा सेट 6-4असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या रामकुमार याने आपल्या खेळात नवीन रणनिती आखत दहाव्या गेमला मार्सेलची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये रामकुमारने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवला. या सेटमध्ये चौथ्या गेममध्ये मार्सेलची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची राखत हा सेट 6-3असा जिंकून विजय मिळवला. यावेळी रामकुमार म्हणाला कि, मार्सेल हा एक उत्कृष्ट खेळाडू असून त्याच्याविरुद्ध मी चांगला खेळ केला. पहिला सेट गमावल्यानंतरही मी माझ्या कामगिरीत सातत्य राखले व त्यामुळेच मी हा सामना जिंकला. तसेच, सामन्यादरम्यान चाहत्यांचा भरघोस पाठिंबा लाभला. 
webdunia
पहिल्या फेरीत भारताच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीला दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे ब्राझीलच्या थियागो मॉन्टेरोला संधी देण्यात आली. स्पर्धेत फ्रांसच्या पाचव्या मानांकित बेनॉय पेर याने लकी लुझर ठरलेल्या ब्राझीलच्या थियागो मॉन्टेरोचा 7-6(5), 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. अतितटीच्या झालेल्या या लढतीत 1तास 27मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये बेनॉय पेर याने तिसऱ्या गेममध्ये मॉन्टेरोची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 7-6(5)असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली.दुसऱ्या सेटमध्ये बेनॉय पेर याने मॉन्टेरोची तिसऱ्या गेमला सर्व्हिस भेदली व सामन्यात 2-1 अशी आघाडी निर्माण झाली. त्यानंतर आघाडीवर असलेल्या बेनॉय याने आपले वर्चस्व कायम राखत मॉन्टेरोची नवव्या गेमला सर्व्हिस भेदली हा सेट 6-3अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.
 
अन्य लढतीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने क्वालिफायर कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलियास्मीवर 6-4, 7-5 असा पराभव केला. हा सामना 1तास 14 मिनिटे चालला. दुसऱ्या सामन्यात इटलीच्या क्वालिफायर सिमॉन बोलेल्ली याने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनचा 6-4, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली
 
दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या रोहन बोपन्नाने दिवीज शरणच्या साथीत  मोल्दोव्हाच्या राडू अल्बोट व ट्युनेशियाच्या मालेक झाजेरी या जोडीचा 6-1, 6-2असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. तर, भारताच्या लिएंडर पेस व मेक्सिकोच्या स्पेनच्या डेव्हिड मरेरो व चीनच्या पॉडलिपींक यांचा 6-3, 6-4असा पराभव केला.
 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):
इवो कार्लोविच(क्रोएशिया)वि.वि. फेलिक्स ऑगर अलियास्मी(कॅनडा) 6-4, 7-5;
सिमॉन बोलेल्ली(इटली)वि.वि. डेनिस इस्तोमिन(उझबेकिस्तान)6-4, 6-4;
बेनॉय पेर(फ्रांस)(5)वि.वि.थियागो मॉन्टेरो(ब्राझील) 7-6(7-5), 6-3;
रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.मार्सेल ग्रनॉलर्स(स्पेन) 4-6, 6-4, 6-3;
 
दुहेरी गट:
रोहन बोपन्ना/दिवीज शरण(भारत)वि.वि.राडू अल्बोट(मोल्दोव्हा)/मालेक झाजेरी(ट्युनेशिया) 6-1, 6-2;
डेनिस मोलचानोव्ह(युक्रेन)/इगोर झेलानी(स्लोव्हाकिया) वि.वि.पाब्लो अंदुयार(स्पेन)/रॉबेर्टो बाईना(स्पेन)6-1,   6-4;
लिएंडर पेस(भारत)/मिगेल अँजेल रेयेस(मेक्सिको)वि.वि.डेव्हिड मरेरो(स्पेन)/हंस पॉडलिपींक(चीन) 6-3, 6-4.  

अभिजित देशमुख

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sabrimala Temple: 800 वर्ष जुनी परंपरा मोडण्यात आली असून मंदिरात दोन महिलांचा प्रेवश