AFC U-20 फुटबॉल आशियाई चषक पात्रता फेरीत भारताने बुधवारी मंगोलियाचा 4-1 असा पराभव करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. केल्विन सिंग टॉरेमने 20 व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला.
यानंतर मांगलेंथांग किपजेनने 51व्या आणि 54व्या मिनिटाला दोन गोल करत संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. भारतासाठी चौथा गोल कोरौ सिंग थिंगुजमने 85व्या मिनिटाला केला. मंगोलियाकडून एकमेव गोल टेमुलेन उगानबॅटने 45व्या मिनिटाला केला. भारतीय संघ आता 27 सप्टेंबरला इराण आणि 29 सप्टेंबरला लाओसशी भिडणार आहे.
भारताने मंगोलियाचा 4-1 असा पराभव करून एएफसी अंडर-20 फुटबॉल आशियाई कप पात्रता फेरीत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते मात्र उत्तरार्धात भारताने मंगोलियाचा बचाव मोडून काढत तीन गोल केले. केल्विन सिंग टॉरेमने 20 व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला
मांगलेंथांग किपजेनने 51व्या आणि 54व्या मिनिटाला दोन गोल करत संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. भारतासाठी चौथा गोल कोरौ सिंग थिंगुजमने 85व्या मिनिटाला केला. मंगोलियाकडून एकमेव गोल टेमुलेन उगानबॅटने 45व्या मिनिटाला केला. भारतीय संघ आता 27 सप्टेंबरला इराण आणि 29 सप्टेंबरला लाओसशी भिडणार आहे.