Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

आईने कपडे शिवून शैलीला केले चॅम्पियन: लहानपणी चांगले शूज देखील नव्हते

U20 World C'ships: India's Shaili Singh wins silver in long jump
, सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (13:22 IST)
टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची यशस्वी मोहीम नीरज चोप्राच्या सुवर्णपदकासह संपली, पण त्यानंतरही देशाचे खेळाडू चमकत आहे. शैली सिंगने जागतिक अंडर -20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मुलींच्या लांब उडी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. सध्याच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक आहे. ज्याप्रमाणे शैलीचे पदक विशेष आहे, त्याचप्रमाणे त्याच्या संघर्षाची कहाणीही देशातील तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे. 17 वर्षांच्या शैलीने गरिबी आणि कौटुंबिक अडचणींवर मात करून आज देशाचे नाव उंचावले आहे.
 
उत्तर प्रदेशातल्या झांशीमध्ये 7 जानेवारी 2004 रोजी शैलीचा जन्म झाला. विनिता सिंह, म्हणजे शैलीची आई तिचा सांभाळ करतात. त्या एकल माता आहेत. विनिता टेलरिंगचं काम करतात. अॅथलेटिक्समध्ये करिअर करायचं आहे हे सांगितल्यावर विनिता यांना धक्काच बसला. शैली आणि तिची आई ज्या भागात राहतात तिथे पायाभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत अॅथलेटिक्ससारख्या खेळात वाटचाल करण्याची मुलीची इच्छा प्रत्यक्षात साकारणं सोपं नव्हतं. मात्र शैलीची जिद्द आणि खेळातलं प्राविण्य पाहून विनिता यांनी तिला प्रोत्साहन दिलं.
webdunia
रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांनी शैलीतले गुण हेरले. जॉर्ज दाम्पत्याने शैलीला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. शैली आता बेंगळुरूस्थित अंजू बॉबी जॉर्ज फाऊंडेशनमध्ये सराव करते. झांशीहून बेंगळुरूला येण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती.
 
अंडर -18 मध्ये जागतिक क्रमांक -1
शैलीने कनिष्ठ स्तरावर अनेक वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. 18 वर्षांखालील गटात ती जागतिक क्रमवारीत 1 लाँग जम्पर आहे. अंजू बॉबी जॉर्जला विश्वास आहे की शैली येत्या काही दिवसांत तिचा विक्रम मोडून देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकेल.
webdunia
गती ही शैलीची शक्ती आहे
रॉबर्ट बॉबी जॉर्ज म्हणतात की लांब उडीमध्ये वेग आणि ताकद खूप महत्त्वाची असते. शैलीकडे प्रचंड वेग आहे. त्यांनी म्हटले की जशी जशी शैली मोठी होईल तिची स्ट्रेंथ वाढेल आणि ती आणखी उंची गाठू शकेल. मात्र, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोन्याच्या हॉलमार्किंगला विरोध का होतो आहे?