Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉक्सिंग: मकरन कपमध्ये भारताने 1 गोल्ड आणि 5 सिल्वर मिळविले

बॉक्सिंग: मकरन कपमध्ये भारताने 1 गोल्ड आणि 5 सिल्वर मिळविले
, शुक्रवार, 1 मार्च 2019 (18:46 IST)
भारताचे चँपियन बॉक्सर दीपक कुमारने इराणच्या बहरमध्ये चालत असलेल्या मकरन कपमध्ये चांगला प्रदर्शन करून सुवर्ण पदक जिंकले आहे. याशिवाय पाच अन्य भारतीय बॉक्सर्सने देखील त्यांच्या संबंधित वर्गामध्ये रजत पदक जिंकले. हरियाणाच्या दीपकने बुधवारी रात्री खेळलेल्या 49 किलोग्रॅम वर्गाच्या फाइनलमध्ये जाफर नसेरीला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. या व्यतिरिक्त पी. ललिता प्रसाद (52 किलो), कॉमनवेल्थ गेम्स रजत पदक विजेता मनीष कौशिक (60 किलो), दुर्योधन सिंह नेगी (69 किलो), संजीत (91 किलो) आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये रजत पदक मिळवणारे सतीश कुमार (91 किलो) यांनी देखील त्यांच्या संबंधित वर्गात रजत पदक जिंकले. नॅशनल चॅम्पियन मनीषला दानियल शाह बक्शने पराभूत केलं जेव्हा की सतीशला मोहम्मद एमिलियसने पराभूत केलं. गेल्या वर्षी इंडियन ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या संजीतला अंतिम फेरीत एल्डिन घौसनकडून पराभव स्वीकारावी लागली. 
 
प्रसादला ओमिद साफा अहमदीने हरवले आणि दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. वेल्टरवेट फाइनलमध्ये दुर्योधनला सजद जाहेद काजीम यांनी पराभूत केलं. यापूर्वी, रोहित तोकस (64 किलो) आणि मनजीतसिंह पंघाल पराभूत मिळण्याने कांस्यपदक मिळाले होते. दीपक तीन वेळा राष्ट्रीय विजेता राहिले आहे. या स्पर्धेत हा भारताचा एकमेव सुवर्ण पदक आहे. या स्पर्धेत भारताने एकूण आठ पदक जिंकले आहे, यात एक गोल्ड, 5 सिल्वर आणि 2 ब्रॉन्ज पदक सामिल आहे.
 
पहिल्या फेरीत शानदार खेळ खेळणार्या दीपकला दुसऱ्या फेरीत दुखापत झाली होती आणि सामना येथे थांबवावा लागला. तरीपण, न्यायाधीशांनी दीपक यांना विजेते घोषित केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालघर सह गुजरातला ही भूकंपाचे धक्के