Indian Hockey Team: भारतीय पुरुष हॉकी संघाने दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात अननुभवी जर्मनीचा 3-1 असा पराभव करून FIH प्रो लीग टेबलमध्ये आपले अव्वल स्थान मजबूत केले. भारताकडून सुखजित सिंग (19व्या मिनिटाला), वरुण कुमार (41व्या मिनिटाला), अभिषेक (54व्या मिनिटाला) यांनी गोल केले, तर जर्मनीसाठी एकमेव गोल अँटोन बोकेल (45व्या मिनिटाला) यांनी केला.
हॉकी संघाने जर्मनीचा पराभव केला
भारताने पहिल्या सामन्यात जर्मनीचा 3-0 असा पराभव केला होता. भारत आता 12 सामन्यांत 27 गुणांसह अव्वल तर जर्मनी 10 सामन्यांतून 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 22 सदस्यीय जर्मनी संघापैकी 6 खेळाडूंनी या दोन सामन्यांद्वारे वरिष्ठ स्तरावर पदार्पण केले आहे. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये काही हल्ले केले पण त्यांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये चार मिनिटांतच सुखजीतने मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मनप्रीत सिंग आणि नीलकांत शर्मा यांच्या चालीवर त्याने वर्तुळाच्या उजव्या बाजूने हा गोल केला.
भारतीय संघाने हल्ला केला
पहिला गोल झाल्यानंतर भारतीयांमध्ये उर्जा संचारली आणि त्यांनी दुसऱ्या क्वार्टरमध्येही आक्रमणे सुरूच ठेवली. जर्मनीनेही प्रत्युत्तर दिले पण भारताचा बचाव तगडा आणि सज्ज होता. उत्तरार्धात भारताला तीन मिनिटांत पेनल्टी कॉर्नर मिळाला पण हरमनप्रीतचा फटका जर्मनीचा गोलरक्षक जीन डेनेनबर्गने वाचवला.
भारतीय खेळाडू अप्रतिम
भारतासाठी वरुणने ४१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून आघाडी दुप्पट केली. त्यानंतर चार मिनिटांनी अँटोनने जर्मनीसाठी गोल केला. भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आधीच बाहेर आला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा अँटोनने घेतला. अभिषेकने 54व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल केला. या दोन विजयांसह, FIH प्रो लीगमधील भारताची होम मोहीम संपुष्टात आली.