राष्ट्रकुल चॅम्पियन भारतीय शटलर लक्ष्य सेन आणि देशबांधव किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी येथे आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ गेममध्ये विजय मिळवत पुरुष एकेरीच्या इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत 20व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यने जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाच्या जी जिया लीवर 21-17,21-13 असा अवघ्या 32 मिनिटांत विजय नोंदवला, तर श्रीकांतने चीनच्या लिऊ गुआंग झूचा 21-17,21-13 असा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला
जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर असलेल्या ल्यूविरुद्ध आपले वर्चस्व कायम राखले. श्रीकांतने चीनच्या खेळाडूविरुद्धचे आतापर्यंतचे पाचही सामने जिंकले आहेत. मात्र, पुढील फेरीत लक्ष्य आणि श्रीकांत आमनेसामने भिडतील. त्यात एकाचा पराभव होणार.
भारताच्या प्रियांशू राजावतनेही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याला थायलंडच्या कुनलावुत विटिडसार्नविरुद्ध वॉकओव्हर मिळाला.
दुस-या फेरीत मात्र राजावतला सोपा रस्ता नसेल कारण त्याचा सामना डेन्मार्कच्या हॅनेस-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगास आणि द्वितीय मानांकित स्थानिक अँथनी सिनिसुका गिंटिंग यांच्यातील विजेत्याशी होईल.