Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

आंतरराष्ट्रीय नेमबाज मनू भाकरच्या आजी आणि मामाचे रस्ता अपघातात निधन

Shooting player manu bhaker
, रविवार, 19 जानेवारी 2025 (15:09 IST)
आंतरराष्ट्रीय नेमबाज मनू भाकरच्या आजी आणि मोठ्या मामाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रगड बायपास रोडवर स्कूटी आणि ब्रेझा कारमध्ये धडक झाली. त्यात मनू भाकरचे मामा युद्धवीर सिंह आणि आजी सावित्री देवी यांचे निधन झाले आहे. 
ही टक्कर इतकी भीषण होती की, मनू भाकरचे मामा आणि आजी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मनू भाकर यांना दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शव विछेदनासाठी पाठविण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, युद्धवीर यांचे घर महेंद्रगड बायपासवर आहे. ते स्कूटरवरून ड्युटीसाठी जात होते. सावित्रीदेवींनाही त्यांनी आपल्यासोबत बसवले. सावित्री देवी यांना  लोहारू चौकाजवळ युद्धवीर यांच्या धाकट्या भावाच्या घरी सोडायचे होते. त्यांचे स्कूटर महेंद्रगड रोडवरील कालियाना वळणावर आले असता समोरून एक कार राँग साइडने येत होती. वेग जास्त असल्याने कार स्कूटरला धडकली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली, तर स्कूटरवर बसलेले आई-मुलगाही रस्त्यावर पडून मृत्युमुखी झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विछेदनासाठी पाठवले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हौथी बंडखोरांनी इस्रायली संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य करत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले