देशाच्या राजधानीत सुरु असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये भारतीय नेमबाजांची शानदार कामगिरी सुरुच आहे. बुधवारी 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत चिंकी यादवने दमदार कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने या प्रकारात क्लीन स्वीप दिला.
कारण रौप्य व कांस्य ही दोन्ही पदकेही भारताच्याच खात्यात जमा झाली आहेत. येथे राही सरनोबतने रौप्य तर मनू भाकरने कांस्यपदक जिंकले.
23 वर्षीय चिंकीने समान 32 पॉइंट्समुळे झालेल्या शूट-ऑफमध्ये सरनोबतचा पराभव केला व भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 9 इतकी केली. 19 वर्षीय मनूने डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर 28 पॉइंट्ससह कांस्यपदक प्राप्त केले. या तिन्ही नेमबाजांनी यापूवीर्च टोक्यो ऑलिम्पिकचा कोटा प्राप्त केला आहे.