Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्युड फेलिक्स हॉकी प्रशिक्षकपदी

ज्युड फेलिक्स हॉकी प्रशिक्षकपदी
बेंगळुरू: येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या दक्षिण विभागीय केंद्रामध्ये भारताच्या कनिष्ठ पुरूष हॉकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे माजी कर्णधार ज्युड फेलिक्स यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी हरेंद्रसिंग यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
 
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी संघाची कामगिरी समाधानकारक झाली होती. आता माजी कर्णधार ज्युड फेलिक्सकडून हॉकी संघाला चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई1993 साखळी बॉम्बस्फोट : फैसला 16 जूनला