Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लक्ष्य निर्धारित करून जिवापाड मेहनत करा: ज्वाला गुट्टा

लक्ष्य निर्धारित करून जिवापाड मेहनत करा: ज्वाला गुट्टा
मी लक्ष्य निर्धारित केले आणि त्यानुसार जिवापाड मेहनत केली व लक्ष्य साध्य केले. कुठल्याही क्षेत्रात नाव कमावण्यासाठी धाडस आणि आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. आत्मविश्वासपूर्वक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन भारताची दुहेरची तज्ज्ञ बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने केले.
 
येथील बीएनडी शिक्षा निकेतन शाळेच्या आरोग्य समाज समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ती प्रमुख पाहुणी म्हणून आली होती. समितीतर्फे आरोग्य जागृती अभियानात करणार्‍या 37 विद्यार्थ्यांना यूथ आयकॉन पुरस्कार स्वरूपात ज्वालाच्या हस्ते लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले.
 
ज्वाला म्हणाली की, स्वच्छता हे जीवनाचे अविभाज्य अंग असून आपल्या जवळपासचे वातावरण स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे. या माध्यमातूनच आपण देशाला पुढे नेऊ शकतो. आपले स्वच्छ भारत अभियान अन्य देशांसाठी प्रेरणास्थान व्हावे, यापेक्षा अधिक आनंद कुठलाच राहणार नाही. अजूनही माझा बराच खेळ शिल्लक आहे. मी सध्या केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करू इच्छिते, असेही ती म्हणाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिन तेंडुलकरचे 44 व्या वर्षात पदार्पण