Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र केसरीचा वाद पोलिसांत, पंचांना धमकीचा फोन

sikandar
, सोमवार, 16 जानेवारी 2023 (22:00 IST)
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आणि सोशल मीडियावर सिकंदर नावाचे वादळ घोगवले. सिकंदरवर शेखवर पंचांकडून अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागली. तर, हार कर जितनेवाले को सिकंदर कहत है... अशा पोस्टही व्हायरल झाल्या. त्यामुळे, पंचांच्या निर्णयावर कुस्तीविश्वात आणि सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उभा होत आहे. आता, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतीला हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. याप्रकरणी, स्पर्धेतील पंचांना फोन करुन धमकी दिल्यासंदर्भात कुस्ती नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पोलीस अधीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, 
 
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढले. मात्र, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांची कुस्ती वादाचा विषय ठरली. त्यानंतर, या लढतीतील पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. महेंद्र गायकवाडने सेमीफायनलमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, चर्चा सिकंदरच्या पराभवाचीच झाली. ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला. अतिशय रोमहर्षक आणि राज्याचं लक्ष लागलेल्या या सामन्यात शिवराज राक्षेनं विजय मिळवला. पण, या विजयापेक्षाही सेमीफानयलची लढत चर्चेत ठरली.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मला ठाकरे गटाचा अधिकृत पाठिंबा आहे : शुभांगी पाटील