Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
, शनिवार, 4 जानेवारी 2020 (11:29 IST)
पुणे- मामासाहेब मोहोळ यांच्याकडून 1961 पासून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. मात्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचे 1982 साली निधन झाल्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. 
 
गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते. महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत 
चर्चेची ठरते.
 
दर वर्षी प्रमाणे यंदा ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कार्पोरेशन लिमिटेड तर्फे 2 जानेवारी ते 7 जानेवारी 2020 दरम्यान 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ह्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाराष्ट्र केसरी गटांच्या कुस्तीच्या लढतीला शनिवार पासून सुरुवात होणार आहे. 
 
बालेवाडीच्या शिव छत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा पार पडत असून यंदा ह्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वजनी गटामधील सुवर्णपदक, रोप्यपदक, व कांस्यपदक पटकवणाऱ्या विजेत्यांना "अमनोरा" च्या वतीने रोख बक्षिसे देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे.
 
या स्पर्धे अंतर्गत मातीवरील आणि गादीवरील प्रत्येकी (१०) अश्या एकूण 20 गटात कुस्ती स्पर्ध्या घेतल्या जाणार आहे.
 
वजनी गटात- 57, 61 , 65 ,70 , 74 , 79 , 86 ,92 , 97 किलो आणि महाराष्ट्र केसरी गट असे तब्बल 10 वजनी गट आहे.

900 ते 950  कुस्तीगीर आणि 125 पंच ह्या स्पर्धेसाठी बालेवाडीत दाखल होणार आहे. मातीवरील कुस्तीसाठी 2 आणि गादीवरील कुस्तीसाठी 2 आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1700 किमीचा प्रवास करून वाघोबा आता बुलडाणा मुक्कामी