Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंधूला मिळालेल्या बक्षिसाने मारिन हैराण

सिंधूला मिळालेल्या बक्षिसाने मारिन हैराण
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये मारिनने सिंधूला हवरत सुवर्णपदक जिंकले होते. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर विविध स्तरातून तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. सिंधूला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ऐकून मारिन ही हैराण झाली आहे. 
 
स्पेनमध्ये असे काही घडत नाही. इथे सगळे वेगळे आहे. मी सुवर्ण जिंकले तर सिंधूने रौप्य. मात्र, मला हे ऐकून आश्चर्य वाटले की तिच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव झाला. मलाही सुवर्णपदक जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून काही रक्कम मिळाली. मात्र, त्याची तुलना सिंधूच्या रकमेशी केली जाऊ शकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनुष्का-विराटने केली नवीन घराची पाहणी