Publish Date: Tue, 22 Nov 2016 (10:52 IST)
Updated Date: Tue, 22 Nov 2016 (10:59 IST)
रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती मल्ल ट्युनेशियाची मारवा अमरी हिची मुंबई भेटीत अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची इच्छा अपुरीच राहिली. शेवटी तिने मन्नतसमोर सेल्फी काढून दुधाची तहान ताकावर भगावली. इंग्लंडच्या याना रॅटिगनसोबत प्रो कुस्तीच्या कार्यक्रमासाठी मारवा मुंबईत आली होती. यावेळी तिने वेळात वेळ काढून शाहरुखच्या बांद्र येथील मन्नत या निवासस्थाला भेट दिली, पण शाहरुखची भेट झाली नसल्याने ती निराश झाली. शेवटी तिने बंगल्यासमोर सेल्फी घेण्यावरच समाधान मानले. उत्तर आफ्रिका खंडात वसलेल्या ट्युनेशिया देशात ट्युनेशियन अरबी भाषा बोलली जाते.