रेड कार्ड मिळाल्यानंतर किलियन एमबाप्पेशिवाय खेळणाऱ्या रिअल माद्रिदने अलाव्हेसविरुद्ध 1-0 असा विजय मिळवला. स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगाच्या या सामन्यात, रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर एमबाप्पेला 2019 नंतर पहिल्यांदाच रेड कार्डचा सामना करावा लागला.
अलाव्हेसच्या मिडफिल्डर अँटोनियो ब्लँकोवर चुकीच्या वेळी टॅकल केल्यामुळे एमबाप्पेला हाफ टाईमच्या अगदी आधी मैदानाबाहेर पाठवण्यात आले. फ्रान्सच्या या स्टार खेळाडूला सुरुवातीला पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते परंतु व्हिडिओ रिव्ह्यूनंतर पंचांनी ते लाल कार्डमध्ये बदलले.
2019 नंतर पहिल्यांदाच एमबाप्पेला कोणत्याही स्पर्धेत लाल कार्ड मिळाले आहे. यामुळे, तो किमान पुढील रविवारी अॅथलेटिक बिल्बाओ विरुद्धच्या स्पॅनिश लीग सामन्यात खेळू शकणार नाही. 34 व्या मिनिटाला एडुआर्डो कॅमाविंगाने रियल माद्रिदसाठी गोल केला जो अखेर निर्णायक ठरला.
यामुळे रिअल माद्रिद आणि अव्वल स्थानावर असलेल्या बार्सिलोनामधील अंतर फक्त चार गुणांवर आले आहे. बार्सिलोनाचे 31 सामन्यांत 70 गुण आहेत आणि रिअल माद्रिदचे तेवढ्याच सामन्यांत 66 गुण आहेत.