राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले आहे. मीराबाईने महिलांच्या 48 किलो वजनी गटात 189 किलो वजन उचलले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचे खाते उघडले. वेट लिफ्टर पी. गुरुराजा यांनी 56 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यांनी 56 किलो वजनी गटामध्ये क्लिन 111 आणि स्नेच 138 किलो वजन उचलून भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे.
गुरुराजाने वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक मिळविले. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाकडून श्रीलंकेचा धुव्वा, 3-0 ने भारतीय महिलांचा विजय झाला. मात्र हॉकीमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात झाली असून वेल्सच्या महिला संघाने भारतीय महिलांना 3-2 च्या फरकाने हरवले.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 21 व्या राष्ट्रकुल खेळांना सुरुवात झालेली आहे. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे.