भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता सेराफिम बेर्जाकोव्हच्या देखरेखीखाली बेल्मेकेन, बल्गेरिया येथे प्रशिक्षण घेतील आणि क्रीडा मंत्रालय TOPS द्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करेल.
तीन वेळा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती विनेश तिच्या फिजिओ अश्विनी पाटीलसोबत बेलमेकेनला जाणार आहे. बेल्मेकेन समुद्रसपाटीपासून सुमारे 2600 मीटर उंचीवर वसलेले आहे. 19 दिवसीय शिबिर 7 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि या दरम्यान अव्वल कुस्तीपटू बिलियाना दुडोवा (2021 वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्ण विजेती) आणि एव्हलिना निकोलोवा (2020 ऑलिम्पिक कांस्य विजेती) देखील सामील होऊ शकतात.
याशिवाय 18-19 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या बिल फॅरेल आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बजरंग पुनियाला क्रीडा मंत्रालय मदत करेल. बजरंग आणि विनेशने 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुढच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळला जाईल.