Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोठी बातमी! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मोहोळ

Murlidhar Mohol elected Maha Olympic Association chief
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) अध्यक्षपदी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे हे अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत क्रीडा वर्तुळात मोठी उत्सुकता होती.
 
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. मात्र, त्यावेळी तडजोड होऊन अजित पवार अध्यक्ष तर मोहोळ उपाध्यक्ष झाले होते. आता रिक्त झालेल्या जागी मोहोळ यांची सर्वसंमतीने निवड झाली आहे.
 
मध्यंतरी सुनेत्रा पवार यांचे नावही या पदासाठी चर्चेत होते, मात्र अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर एकमत झाले. मुरलीधर मोहोळ हे स्वतः कुस्तीगीर आणि क्रीडाप्रेमी असल्याने, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील खेळाडूंना ऑलिंपिक स्तरावर अधिक चांगल्या संधी आणि सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुनेत्रा पवार यांची निर्णायक आघाडी, आज ठरणार बारामतीचा निकाल! शेवटच्या क्षणी गेम पलटणार?