Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुस्लिम अॅथलिटसाठी स्पोर्ट्सवेअर हिजाब बाजारात

मुस्लिम अॅथलिटसाठी स्पोर्ट्सवेअर हिजाब बाजारात
मुस्लिम समुदायाच्या अॅथलिट खेळाडूंसाठी नाईके या क्रीडा क्षेत्रातील अग्रणी स्पोर्ट्स ब्रॅण्डने स्पोर्ट्सवेअर हिजाब बाजारात दाखल केला आहे. मुस्लिम महिला अॅथलीटचा विचार करून अॅथलिटला खेतेवेळी देखील हिजाब परिधान करता येईल आणि त्याचा खेळात कोणाताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन खास हिजाब तयार करण्यात आला आहे.
 
खुद्द मुस्लिम महिला अॅथलिट्सकडून यासाठीचे सल्ले घेऊन त्यापद्धतीने हिजाब तयार करण्यात आला आहे. फिगर स्केटर झारा लारी हिनेही हा हिजाब स्केटिंगदरम्यान वापरून पाहिला.
 
नायलॉन मटेरियलचा वापर करून अतिशय हलका हिजाब तयार करण्यात आला असून त्यावर बारीक खड्डे देखील ठेवण्यात आले आहेत. आपला नियमित खेळ करताना खेळाडूंना‍ श्वसनाचा त्रास होणार नाही याची काळजी यात बाळगण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोहलीचा आई आणि अनुष्कासाठी खास संदेश