अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपल्या देशाचे नावं आंतराष्ट्रीय खेळात उंचावणारा दत्तू भोकनळ बारावी उत्तीर्ण झाला आहे. जिल्ह्यातील तळेगाव रोही येथील रहिवासी आहे. दत्तू भोकनळ याने भारताचे प्रतिनिधित्त्व आॅलिम्पिक स्पर्धेत रोर्इंग क्रिडाप्रकारात केले होते. दत्तूने यावर्षी बारावीची परीक्षा दिली. या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला आहे. त्याने ६५०पैकी ३४४ एकूण गुण मिळवले आहे. तर एकूण ५२.९२ टक्क्यांनी तो पास झाला आहे.
दत्तू हा अत्यंत गरीब कुटुंबातून, जिद्दीतून गरीबीवर मात करीत भारतीय सैन्यदलात प्रवेश केला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे उच्चशिक्षणाचे स्वप्न पुर्ण होणार आहे.