Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रमवारीपेक्षा कामगिरीवर लक्ष: सिंधू

ऑलिम्पिक
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे लक्ष्य आता क्रमवारीत नंबर एक वर पोहचण्याचे आहे. क्रमवारीपेक्षा मी कामगिरीवर जास्त लक्ष देते, पण कामगिरीत मी सातत्य ठेवू शकले तर एक दिवस नक्कीच नंबर एकची खेळाडू होईन, असा आत्मविश्वास सिंधूने व्यक्त केला.
 
सिंधू इंडियन ओपन सुपर सीरीजचे विजेतेपद पटकावल्यानंतर बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर पोहोचली होती. पण गेल्या आठवड्यात सिंधूला सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सिंधूच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण होऊन ती आता तिसर्‍या क्रमांकावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 10: डोक शांत असल्या कोणताही रनरेट अधिक नसतो- धोनी