Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंधू पुन्हा मैदानात

सिंधू पुन्हा मैदानात
रिओ ऑलिम्पिकची रौप्यविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता डेन्मार्क ओपन सुपर सीरीजमधून पुनरागमन करणार आहे.
 
ओडेनमध्ये या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत सिंधूचा सहभाग हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सिंधूसमोर आपल्या पहिल्या सामन्यात चीनच्या हे बिंगिजिआओचे आव्हान असेल.
 
सिंधूला गेल्या वर्षी डेन्मार्क ओपनमध्ये उपविजेतपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा सिंधूला या स्पर्धेसाठी सहावे मानांकन देण्यात आले आहे.
 
ऑलिम्पिक रौप्य पदक ‍आणि दोनदा जागतिक स्पर्धेचे कांस्यपदक मिळवणार्‍या सिंधूला आजवर एकही सुपर सीरीज विजेतेपद मिळवता आलेले नाही. सिंधू ती उणीव कधी भरून काढते याची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराटला आले हसू!