Publish Date: Mon, 21 Nov 2016 (11:18 IST)
Updated Date: Mon, 21 Nov 2016 (11:22 IST)
ऑलिम्पिक रौंप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले आहे.
पी.व्ही.सिंधु हिने चायना खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सिंधुने चीनच्या सून यूवर हिचा २१-११, १७-२१, २१-११ पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. सिंधूने पहिला गेम २१-११ असा जिंकला. दुसरा गेम मात्र तिला गमवावा लागला. मात्र तिसरा गेम जिंकत सिंधूने सामनाही खिशात घातला.
यापुर्वी सिंधुला डेन्मार्क आणि फ्रेन्च खुल्या स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले होते
सिंधुने पहिल्यांदा मिळवलेल्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे .भ