Publish Date: Sat, 16 Sep 2017 (15:12 IST)
Updated Date: Sat, 16 Sep 2017 (15:15 IST)
भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत सिंधूने ऑलिम्पिक रौप्य विजेत्या जपानच्या मितासू मितानीचा 21-19 18-21 21-10 पराभव केला होता.