rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कब्बडीपटूची भरदिवसा हत्या!

crime
, शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 (13:55 IST)
पंजाबमधील लुधियाना येथील जगरावं येथे शुक्रवारी एका कबड्डी खेळाडूची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २५ वर्षीय कबड्डी खेळाडू तेजपाल सिंगची शुक्रवारी लुधियाना (ग्रामीण) एसएसपी कार्यालयाजवळील जगरावं येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली.  
 
मिळलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यासाठी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
 
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की तेजपाल काही वैयक्तिक कामासाठी जगरावं येथे आला होता. एकाने रिव्हॉल्व्हर काढला आणि त्याच्या छातीत गोळी झाडली. त्याच्या मित्रांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांचे म्हणणे आहे की ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे दिसून येते. 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नीने काळी जादू करण्यास नकार दिला, पतीने तिच्यावर उकळती फिश करी फेकली; अंधश्रद्धेचे धोकादायक सत्य