Publish Date: Sat, 25 Feb 2017 (08:56 IST)
Updated Date: Sat, 25 Feb 2017 (08:57 IST)
पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकून दिले. माजी आशियाई चॅम्पियन असलेल्या २८ वर्षांच्या पूजाने २२८.८ गुणांसह कांस्य जिंकले. चीनच्या मेंगयावो शी हिने २५२.१ गुणांसह सुवर्ण जिंकून नवा विश्वविक्रम नोंदविला. तिची सहकारी डोंलिजी हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक पटकविले. मागच्यावर्षी रिओ आॅलिम्पिकचा कोटा मिळविण्यात थोड्या फरकाने वंचित राहिलेल्या पूजाने सुरुवातीला तांत्रिक चुका केल्या पण लगेच सावरत पहिल्या फेरीत ती दुसºया स्थानावर राहिली. अंतिम फेरीत लिजीकडून कडवे आव्हान मिळाल्यानंतरही फायनलदरम्यान पूजाच्या बंदूकचे ब्लार्इंडर पडले. तरीही अखेरचे काही शॉट तिने डोळे बंद करीत मारले . त्याआधी पात्रता फेरीत पूजाला ४१८ आणि मेंगयाओला ४१८.६ तर लिजीला ४१७.७ गुण मिळाले होते.