प्रो कबड्डी लीग 2023 च्या तिसऱ्या दिवशी दोन मोठे सामने खेळले जात आहेत. दिवसाच्या पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण जयपूर पिंक पँथर्सशी भिडणार आहे. पुणे आणि जयपूर यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. पुणे सध्या 7-4 ने आघाडीवर आहे. पुणेरी पलटण सोमवारी अहमदाबादमधील ट्रान्सस्टेडियाच्या एरिना येथे गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सशी भिडणार आहे.
पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डीमध्ये अनेकदा एकमेकांशी खेळले आहेत. या कालावधीत पिंक पँथर्स 21 पैकी 11 सामने जिंकून सर्वोत्तम संघ ठरला आहे. मात्र, पलटणही मागे नाही. त्यांना आठ वेळा विजयाची नोंद करण्यात यश आले आहे. पुणेस्थित युनिट आगामी सामन्यात विक्रम आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करेल. उभय संघांमधील 21 सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यांचा निकाल लागला नाही आणि ते बरोबरीत राहिले. दोन्ही बाजूंनी आपापल्या मोहिमेची चांगली सुरुवात केल्याने ही आणखी एक रोमांचक लढत होण्याची अपेक्षा आहे.
जयपूर पिंक पँथर्सने गेल्या मोसमातील अंतिम सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला होता. अशा स्थितीत पुणे संघाला आज त्या पराभवाचा स्कोअर सेट करायला आवडेल. अस्लम मुस्तफाच्या दमदार खेळामुळे पुणेरी पलटणने पुन्हा सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. पुणे आता 29-25 ने आघाडीवर आहे. अर्जुन देशवाल जयपूर पिंक पँथर्ससाठी दमदार कामगिरी दाखवत असून त्याच्या नावावर आतापर्यंत एकूण 6 गुण झाले आहेत
पुणेरी पलटण संघ : आदित्य तुषार शिंदे, आकाश संतोष शिंदे, अस्लम मुस्तफा इनामदार, मोहित गोयत, पंकज मोहिते, आणि शुभम नितीन शेळके, अलंकार काळूराम पाटील, बाळासाहेब शाहजी जाधव, डीआर महेंद्र जाधव. , हर्ष महेश लाड , राकेश भल्ले राम , फजल अत्राचली. अबिनेश नादराजन, बादल तकदीर सिंग, संकेत सावंत आणि सोम्बीर, मोहम्मद इस्माईल नबीबख्श आणि गोविंद गुर्जर.
जयपूर पिंक पँथर्स संघ: सुनील कुमार, अर्जुन देशवाल, अजित कुमार व्ही, रजा मिरभागेरी, भवानी राजपूत, साहुल कुमार, अंकुश, अभिषेक केएस, आशिष, देवांक, अमीर होसेन मोहम्मद मलेकी, शशांक बी, लकी शर्मा, लॅविश, नवनीत, राहुल चौधरी . सुमित.