Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Wimbledon 2022: राफेल नदालने विम्बल्डन ओपनची तिसरी फेरी गाठून विक्रमी 307 विजय नोंदवला

nadal
, शुक्रवार, 1 जुलै 2022 (22:31 IST)
स्पॅनिश टेनिसस्टार राफेल नदालचा शानदार प्रवास सुरूच आहे. विक्रमी 22 ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल आपले 23वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या मार्गावर आहे. विम्बल्डन ओपनमध्ये त्याने दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करत तिसरी फेरी गाठली. राफेल नदालने दुसऱ्या फेरीत रिकार्डो बेरँक्विसचा 6-4, 6-4, 4-6, 6-3 असा पराभव केला. हा त्याचा विक्रमी 307 वा विजय ठरला. आता त्याचा पुढचा सामना लोरेन्झो सोनेगोशी होणार आहे. 
 
या सामन्याच्या सुरुवातीला नडाल लयीत दिसत नव्हते. मात्र, त्याने अनुभवाचा फायदा घेत सुरुवातीचे दोन्ही सेट 6-4अशा फरकाने जिंकले. सुरुवातीच्या आघाडीनंतर नडालचा विजय जवळपास निश्चित झाला होता, मात्र तिसऱ्या सेटमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला. बेरँकीसने शानदार पुनरागमन करत तिसरा सेट 4-6 अशा फरकाने जिंकला. यानंतर तो नडालला कडवी टक्कर देईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही.नडालने पुढचा सेट अधिक सहज जिंकला आणि सामनाही जिंकला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra 2022 : स्वाधार योजना पात्रता,फायदे, उद्दिष्टये, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या