Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

विम्बल्डन : फेडररची कामगिरी हेच उपान्त्य फेरीचे आकर्षण

roger federer
लंडन , शुक्रवार, 14 जुलै 2017 (08:10 IST)
आज होणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपान्त्य लढतींमध्ये टेनिसशौकिनांना आकर्षण वाटावे, असे एकच नाव आहे. ते म्हणजे महान टेनिसपटू रॉजर फेडरर. फेडररने विम्बल्डनसाठी तंदुरुस्त राहण्याच्या कारणास्तव फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 2012 मध्ये अखेरचा किताब जिंकल्यानंतर त्याला विम्बल्डनने नेहमीच हुलकावणी दिली आहे. परंतु कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असताना फेडररला अचानक विक्रमी आठवे विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याची आणि विश्‍वविक्रमी 19वा ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
 
जगातील “टॉप फोर’ खेळाडू बऱ्याच वर्षांनी एकत्र आले असताना सर्वांनाच उपान्त्य लढतींबद्दल उत्सुकता होती. मरे विरुद्ध फेडर किंवा जोकोविच विरुद्ध फेडरर या सामन्यांची अस्सल टेनिसप्रेमींना नेहमीच प्रतीक्षा असते. परंतु अँडी मरे आणि नोव्हाक जोकोविच यांना दुखापतींनी सतावल्यावर राफेल नदाल जाईल्स म्युलरचा बळी ठरला आणि फेडररला विजेतेपदाची संधी असल्याचे उघड झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनुराग ठाकूरांचा बिनशर्त माफीनामा