Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्टुटगार्ट स्पर्धेत रॉजर फेडररची अग्रस्थानी

स्टुटगार्ट स्पर्धेत रॉजर फेडररची अग्रस्थानी
स्टुटगार्ट , मंगळवार, 19 जून 2018 (11:30 IST)
36 वर्षा्या स्वीस खेळाडू रॉजर फेडरर याने निक किगींओस याचा पराभव करून जागतिक टेनिस मानांकनात आपले अग्रस्थान कायम ठेवले. निर्णायक सामन्यात रॉजरने कॅनडाच्या मिलॉस रॉनीकचा सरळ दोन सेटमध्ये 6-4, 7-6 असा पराभव केला. दुसर्‍या सेटमध्ये मिलॉसने रॉजरला जोरदार झुंज दिली. पण अखेर अनुभवाच्या जोरावर 36 वर्षीय रॉजरने सामन्यात बाजी मारली. आजवरच्या कारकिर्दीतील रॉजरचे हे 98 वे आंतरराष्ट्रीय विजेतेपद होते. या विजयाबरोबरच ग्रॅसकोर्टवर आपणच दादा असल्याचे रॉजरने पुन्हा एकदा दाखवून दिले. विक्रमी 9 व्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकण्यासाठी रॉजर आता सज्ज झाला आहे. रॉजरने स्टुटगार्ट स्पर्धा तिसर्‍यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. अवघ्या 78 मिनिटात त्याने निर्णायक लढत जिंकली. गेल्या 2 वर्षात रॉजरला येथे चांगली कामगिरी करता आली नव्हती. यंदा मात्र त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी पुन्हा करून दाखवली. उपांत्य फेरीची लढत जिंकून रॉजरने 6 व्यांदा जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर झेप घेतली. आपल्या स्पर्धेतील एकूण कामगिरीबाबत रॉजरने समाधान व्यक्त केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

40 वर्षांत प्रथच ब्राझीलला पहिला सामना जिंकता आला नाही