Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोनाल्डोचा गोल पाहून दिग्गज भारावले

रोनाल्डोचा गोल पाहून दिग्गज भारावले
तुरीन , शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (11:40 IST)
चॅम्पिअन्स लीगदरम्यान रिअल माद्रिद आणि ज्युवेंटस यांच्यातील सामन्यादरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेला जबरदस्त गोल पाहून चाहते भारावले आहेत. त्याची स्तुती करताना चाहते थकत नाहीत. फुटबॉलचे चाहते 'हा आतापर्यंतच्या जबरदस्त गोलपैकी एक आहे' असा दावा करत आहेत. रोनाल्डोने बायसिकल किक मारत हा गोल केला होता. रोनाल्डोच्या या गोलचे कौतुक फक्त त्याचे चाहते नाही तर अनेक दिग्गजही करत आहेत. प्रसारमाध्यांमध्येही या गोलची चर्चा सुरू असून, हा अचंबित करणार गोल होता असे अनेकांनी म्हटले आहे.
 
बास्केटबॉलचा दिग्गज खेळाडू लेबॉन जेम्स यानेही रोनाल्डोच्या या गोलचे कौतुक केले आहे. डेली एस्टोरिअनने रोनाल्डोच्या गोलचे कौतुक करताना 'व्हॉट प्लॅनेट डिड यू कम फ्रॉम' म्हणजेच 'कोणत्या ग्रहावरुन आला आहेस' अशी हेडिंग दिली. समाचार पत्रने रोनाल्डोला को 'डी स्टेफानो 2.0'चा किताब देत रिअल माद्रिद 1962 पासून एकदाही ज्युवेंटस विरोधात हारलेली नाही यावर लक्ष केंद्रित केले. 1962 मध्ये रिअल माद्रिदचे खेळाडू अल्फ्रेडो स्टेफानो यांनी सामन्यात एकमात्र गोल करत विजय मिळवून दिला होता. अल्फ्रेडो स्टेफानो यांची गणना महान खेळाडूंमध्ये केली जाते.
 
पण सर्वात वेगळ्या पद्धतीने स्तुती केली आहे ते रोनाल्डोचा माजी सहकारी अल्वारो अ‍ॅर्बेलोआ याने. त्याने म्हटले आहे की, रोनाल्डो आता मंगळ ग्रहावरील लोकांनाही फुटबॉल शिकवू शकतो. जमिनीवर त्याने सर्व प्राप्त केले आहे. जिदानने तर आपल्याला रोनाल्डोने मिळवलेले यश पाहून ईर्ष्या वाटत असल्याचे म्हटले आहे.
 
रोनाल्डोच्या मदतीने रिअल माद्रिदने ज्युवेंटसचा 3-0 ने पराभव केला. रोनाल्डोने पहिला गोल तिसर्‍या मिनिटालाच केला होता, यानंतर शेवटच्या मिनिटात त्याने दुसरा गोल केला. या सत्रात त्याचे 14 गोल झाले आहेत. चॅम्पिअन्स लीगध्ये सलग दहा सामन्यात गोल करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू ठरला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसआरएस ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा