आगामी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेपर्यंत आपला फॉर्म परत येईल, अशी अपेक्षा असल्याचे भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायन नेहवालने म्हटले आहे. पीबीएल स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिन मरीनकडून पराभूत झाल्यानंतर तीने ही प्रतिक्रिया दिली आहे.
आपण आपल्या खेळावर समाधानी असल्याचे तीने सांगितले. आपल्या हालचालींवर मर्यादा येत असल्याची कबुली देताना आपण पुन्हा पूर्वीसारख्या तंदुरूस्त होऊ असा विश्वास व्यक्त केला.