rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सानिया मिर्झाला सेवा कर न भरल्याप्रकरणी नोटीस

sania mirza
, गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (17:31 IST)
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला सेवा कर न भरल्याप्रकरणी सेवा करविभागाने नोटीस बजावली आहे. हैदराबादमधील सेवा कर विभागाच्या प्रधान आयुक्तांनी 6 फेब्रुवारीला या प्रकरणी सानियाला समन्स बजावले. तिला 16 फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले आहे.केंद्रीय अबकारी कायद्यातंर्गत सानियाला हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आपण करचुकवेगिरी केली नाही हे सिद्ध करण्यासाठी सानियाला काही कागदपत्रे ही सादर करावी लागू शकतात. जर तुम्ही समन्सला प्रतिसाद दिला नाहीत. जाणीवपूर्वक गैरहजर राहिलात, पुरावे दिले नाहीत तर आयपीसीच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही शिक्षेला पात्र आहात असे सानियाला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात एकूण 23 रेल्वे स्थानकांचा विकास होणार, यात राज्यातील ६ स्थानके