Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिमोन ची फ्रान्स क्रांती पुण्यात

सिमोन ची फ्रान्स क्रांती पुण्यात
, सोमवार, 8 जानेवारी 2018 (09:29 IST)
प्रतिष्ठेच्या पहिल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा ७-६,6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद जिंकले. श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडीचे सेन्टर कोर्ट स्टेडियम खचाखच भरले होते, पुणेकर पाहिल्याचं एक जागतिक स्पर्धे चे अंतिम सामन्याचे साक्षीदार ठरले.
 
अँडरसन ला एकेरीत दुसरे मानांकन लाभले होते, तसेच तो जगातील १४ व्या स्थानावर आहे. पारडे अँडरसन ची हावी होतेय,  सिमोन जगातील ८९ व्या स्थानावर होता आणि या आधी अँडरसन सोबत तीन वेळेस गाठ पडली होती, एक वेळी सुद्धा सिमोन ला जिंकता आले नाही. सिमोन कडे अँडरसन सारखे मोठी सर्विस नव्हती, त्याचा फोरहँड सुद्धा अँडरसन सारखा शक्तिशाली नव्हता, परंतु सिमोन कडे सुसंगत पने परत मारण्याचे कवशल्य होते. आज त्याने अँडरसन च्या प्रत्येक फोरहँड, बॅकहॅन्ड आणि सर्विस ला परत मारणे हेच धोरण साधून अँडरसन ला परेशान केले. 
 
दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपल्या सर्व्हिस राखल्या. परंतु ७ व्या गेमला सिमोनने अँडरसनची सर्व्हिस भेदत ५-३ अशी आघाडी घेतली. मात्र अँडरसन ने लवकरच सिमोनची सर्व्हिस भेदत ५-५ अशी बरोबरी केली. पहिला सेट शेवटी ट्रायब्रेकरमध्ये गेला आणि ३८ शॉट्स च्या रॅली मध्ये अँडरसन फोरहँड मारण्यात अपयशी ठरला आणि ७-४ ने ट्रायब्रेकर हरला. सगळ्या दर्शकानी या ३८ शॉट्स च्या रॅली नंतर उभे राहून कडकडाने टाळ्या वाजवीत स्टेडियम गाजवले. पहिला सेट ७-६ (७-४) ने जिंकत सिमोन ने अँडरसन चे मनोबल तोडून टाकले. 
 
पहिल्या सेट च्या धक्यातून अँडरसन सावरू शकला नाही आणि दुसऱ्या सेट मध्ये अँडरसन सगळंच हरवून बसला. त्याचा भेदक सर्विस ला सिमोन ने अक्षरशः चिरडून टाकले, सिमोन ने दुसऱ्या सेट मध्ये तब्बल ७ रिटर्न ऐस मारले. अँडरसन कडे सिमोनच्या आज जिगरबाज खेळायचे उत्तरच नव्हते आणि अँडरसन दोन वेळास सर्विस गमवून बसला. दुसऱ्या सेट च्या आठव्या गमे मध्ये सिमोन ने एक फोरहँड मारत सेट,मतच आणि चॅम्पिअनशिप आपल्या नावावर केली. ७-६, ६-२ अश्या फरकाने सिमोन पहिल्या टाटा ओपन चा विजेता ठरला. सिमोन ने आज संपूर्ण खेळ बचावात्मक खेळून सामना जिंकला व हे सुद्धा सिद्ध केले की टेनिस बचावात्मक खेळून सुद्धा जिंकता येतो फक्त सुसंगतपणा हवा.  
 
सामान्य नंतर सिमोन ने पुण्यात प्रेक्षक कडून भेटलेल्या पाठिंबाळ्याचे आभार  मानले व सायाजोकाना सुद्धा यशस्वी केलेल्या आयोजनाचे अभिनंदन केले. आपण पुढच्या वर्षी नक्की येणार अशी खात्री सुद्धा दिली. 
 
दुहेरीत मात्र सिमोन-हर्बर्ट ला पराभवचे सामने करू लागले, अंतिम सामन्यात त्यांना नेदरलँड ची जोडी रॉबिन हस्से-मटवे मिडडेलकूप या जोडी ने सरळ सेट मध्ये ७-६, ७-६ असे विजेतेपद पटकवले.
पुण्याहून अभिजित देशमुख

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'त्या' नोटांच्या बनल्या फाईली