Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रो कबड्डी लीगमध्ये तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा सघांचा समावेश

प्रो कबड्डी लीगमध्ये तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा सघांचा समावेश
, गुरूवार, 30 मार्च 2017 (12:48 IST)
स्टार स्पोर्टसच्या प्रो कबड्डी लीगची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. कबड्डीला सेलिब्रेटी टच आणि ग्लॅमर मिळाल्याने एरवी कुठेही चर्चा नसलेल्या या खेळाबद्दलचं आकर्षणही प्रचंड प्रमाणात वाढलं आहे.
 
प्रो कबड्डी लीगमध्ये जुलैमधल्या आगामी मोसमात चार नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. नव्या संघांमध्ये तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणाचा समावेश आहे.
 
त्यामुळे प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमात यंदा आठऐवजी बारा संघ खेळताना दिसतील.
 
परिणामी प्रो कबड्डी लीगमधल्या एकूण सामन्यांची संख्या 130 वर जाईल.
 
तसंच यंदाचा मोसम हा तेरा आठवड्यांचा असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘पोकेमॉन गो’ गेममुळे पालक-मुलांमधील नाते दृढ होण्यास मदत