भारताचा अव्वल एकेरी खेळाडू सुमित नागलने स्वीडनविरुद्धच्या जागतिक गट एक सामन्यासाठी डेव्हिस कप संघात पुनरागमन केले आहे. हा सामना 14-15 सप्टेंबरला स्टॉकहोममध्ये होणार आहे.सुमित नागल संघाचे नेतृत्व करेल.
दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. याच कारणामुळे यावेळीही मुकुंदला संघात स्थान मिळाले नाही.
सुमित नागल व्यतिरिक्त डेव्हिस कप संघात रामकुमार रामनाथन, एन श्रीराम बालाजी, निक्की पूनाचा आणि माजी राष्ट्रीय विजेता सिद्धार्थ विश्वकर्मा यांचाही समावेश आहे.
आर्यन शाहची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहन बोपण्णाच्या निवृत्तीनंतर दुहेरीत भारताचा नंबर वन खेळाडू असलेल्या युकी भांब्रीने या टायमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
संघाचा कर्णधार रोहित राजपालही परतणार आहे, जो वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.
झीशान अलीने डेव्हिस कप प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी राष्ट्रीय चॅम्पियन आशुतोष सिंग यांची राष्ट्रीय संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.