Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Table Tennis: डब्ल्यूटीटी स्पर्धेत मनिका बत्राचा पराभव

Table Tennis:  डब्ल्यूटीटी स्पर्धेत मनिका बत्राचा पराभव
, सोमवार, 3 जुलै 2023 (18:35 IST)
भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि अचंत शरथ कमल यांना डब्ल्यूटीटी स्पर्धकांच्या एकेरी प्रकारात उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही भारतीय खेळाडूंना त्यांच्या उच्च दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध 0-3 असा समान पराभव पत्करावा लागला. 

मानिकाला जगातील 11 व्या क्रमांकाची कोरियन शिन युबीन ने 11-13, 5-11, 14-16 असा पराभव झाला. तर शरथचा जागतिक क्रमवारीत 16व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या लिन शिडोंगकडून 6-11, 7-11, 5-11 असा पराभव झाला. दुहेरीत दिया चितळे आणि श्रीजा अकुला या भारतीय जोडीने उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांचा पुढील सामना कोरियन जोडी शिन युबिन आणि जिहे जीओन या जोडीशी होणार आहे.



Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

France: पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या किशोरला ओल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप, फ्रांस हिंसाचार कॅरेबियन देशांत पसरले