Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महान फुटबॉलपटू पेलेच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे, मुलीने सोशल मीडियावर माहिती दिली

महान फुटबॉलपटू पेलेच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे, मुलीने सोशल मीडियावर माहिती दिली
, रविवार, 19 सप्टेंबर 2021 (18:04 IST)
ब्राझीलचे दिग्गज फुटबॉल खेळाडू पेलेच्या आतड्यातून गाठ काढण्याच्या ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.आणि त्यांचा मुलीने केली नेसिमेंटो ने सांगितले की ,आता ते हळू-हळू बरे होत आहे.80 वर्षीय पेले यांना आणीबाणीच्या वेळी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या अहवालांवर त्यांनी भाष्य केले नाही. पेलेवर 4 सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली.

केली नेसिमेंटोने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांसोबत एक फोटो शेअर केला, ज्यात तिने सांगितले की हा फोटो नुकताच अल्बर्ट आइन्स्टाईन रुग्णालयात माझ्या वडिलांच्या खोलीत घेण्यात आला आहे. ती म्हणाली, 'ते हळूहळू बरे होत आहे आणि सामान्य स्थितीत आहे.'
 
खरं तर,अशा शस्त्रक्रियेनंतर,एवढ्या वयाच्या व्यक्तीच्या स्थिती कधीकधी थोडी चढ -उतार होते. काल त्यांना खूप थकवा जाणवत होता, पण आज त्यांना बरे वाटत आहे.ब्राझीलने पेलेच्या नेतृत्वाखाली 1958, 1962 आणि 1970 मध्ये फिफा विश्वचषक जिंकला. त्यांनी  आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 92 सामन्यात 77 गोल केले, जे ब्राझीलसाठी एक विक्रम आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंजाब : नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा कधीही होऊ शकते, रंधावा यांचं नाव सगळ्यात पुढे