टोकियो ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी शुक्रवारी भारताने आणखी एक पदक आपल्या नावी केले आहे. बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने महिला 69 किलोच्या उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या नियन चिन चेनचा 4-1 ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी दुसरे पदक निश्चित केले. यापूर्वी वेटलिफ्टर मीराबाई चानूने याच ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक निश्चित केले होते.
बॉक्सर लवलिना हिने महिलांच्या 69 किलो गटात उपांत्य फेरी गाठली आहे.म्हणजेच बॉक्सिंगमधील भारताच्या पदकाची खातरजमा झाली आहे.तिने उपांत्यपूर्व फेरीत चायनीज ताइपे खेळाडू नियन चिन चेनचा 4-1 असा पराभव केला.
बॉक्सर लोव्हलिना उपांत्य फेरीत
भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरी गाठल्यानंतर भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे.