ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा थोडा जास्त कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच जपानमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हारसच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी जपान अधिक कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
एका सरकारी समितीच्या विशेषतज्ज्ञांनी आपत्कालीन उपायांमध्ये काही निणर्यांना प्रारंभिक मान्यता दिली आहे. ज्यामध्ये टोक्यो, पश्चिमी जपान, क्योटो व दक्षिणी द्वीप ओकिनावा यांच्यासाठी काही कठोर पावलांचा समावेश आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा सोवारपासून लागू होणार्या या उपायांची घोषणा करू शकतात. जे मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत लागू असू शकतात. टोक्योमध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण केलेले नाही.