Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tokyo Paralympics 2020: मनीष नरवाल आणि सिंहराज अडानाच्या कौशल्याने ने भारताला सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवून दिली

Tokyo Paralympics 2020:  मनीष नरवाल आणि सिंहराज अडानाच्या कौशल्याने  ने भारताला सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवून दिली
, शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (10:41 IST)
जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये शनिवार भारतासाठी खूप आनंद घेऊन आला. येथे पॅरा खेळाडू मनीष नरवालने नेमबाजीच्या P4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल SH1 स्पर्धेत सुवर्णपदकावर निशाणा साधला, तर त्याच स्पर्धेत भारताच्या सिंगराज अडानाने रौप्यपदकावर कब्जा केला. या सुवर्ण पदकासह  मनीषने भारताला टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. 19 वर्षीय नरवालने 218.2 गुण मिळवत पॅरालिम्पिक खेळांचा विक्रम केला. त्याचबरोबर मंगळवारी कांस्यपदक जिंकणाऱ्या अडानाने 216.7 गुण मिळवून रौप्य पदक जिंकले.
 
रशियन ऑलिम्पिक समितीचे सर्जेइ मालिशेव यांनी 196.8 गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत अडाना 536 गुणांसह चौथ्या आणि नरवाल 533 गुणांसह सातव्या स्थानावर होते. भारताचे आकाश 27 वे स्थान मिळवून अंतिम फेरीत पोहोचू शकले नाही. कारण या मध्ये ,नेमबाज फक्त एक हाताने पिस्तूल धरतात,आणि त्यांच्या एका हात किंवा पायात विकृती आहे जी पाठीच्या कण्याला दुखापत झाली असल्यावर होते.या मध्ये काही नेमबाज उभे राहून आणि काही बसून लक्ष्य साध्य करतात.
 
मनीषच्या आधी 19 वर्षीय अवनी लेखारा हिने 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक होते. याशिवाय अवनीने 50 मीटर रायफल 3 पोझिशन एसएच 1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.अशा प्रकारे अवनी दोन पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्याच्याशिवाय, भालाफेकपटू सुमित अँतीलने या खेळांमध्ये उत्कृष्ट पदार्पण केले, पुरुषांच्या एफ 64 स्पर्धेत अनेक वेळा विश्वविक्रम मोडत दुसरे सुवर्णपदक मिळवून. त्याने दिवसभरात पाच वेळा 62.88 मीटरचा स्वतःचा मागील विश्वविक्रम चांगला केला आणि सुवर्णपदक पटकावले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोईसर MIDC मध्ये भीषण स्फोट