rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजेंदरला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार

vijendar singh
नवी दिल्ली , शनिवार, 14 जानेवारी 2017 (12:56 IST)
स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला दिल्ली क्रिडा पत्रकार संघातर्फे वार्षिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, तर ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक  हरेंद्र सिंह यांना सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणूज गौरवण्यात आले आहे. त्यासोबत भारताचे ऑलिम्पियन आणि विश्व चॅ‍म्पियन पदकविजेते महान पैलवान आणि प्रशिक्षक महाबली सत्पाल यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रशिक्षक हरेंदर सिंह म्हणले की, मी हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांना सांगितले होते की, आम्ही सुवर्ण पदक जिंकू किंवा मी राजीनामा देईन आणि मी पदक जिंकले. महाबली सत्पाल म्हणाले की, फक्त स्टार खेळाडूंकडे लक्ष देण्यापेक्षा युवकांकडेही लक्ष द्यावे. त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअर इंडियात सॉफ्टवेअर खरेदीत घोटाळा