rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजेंदरचे चीनच्या जुल्फिकारला आव्हान

विजेंदर सिंग
भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदरसिंग चीनचा ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मियामॅतियाली याला आव्हान देणार आहे. आशिया पॅसिफिक चॅम्पियन असलेल्या विजेंदरला दुसरे जेतेपद मिळविण्याची आशा असून, ही फाईट नाईट 1 एप्रिल रोजी मुंबईत खेळली जाईल.
 
राष्‍ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णविजेता अखिलकुमार आणि आशियाई चॅम्पियनशिपचा कांस्यविजेता जितेंदरकुमार हेदेखील याच लढतीत खेळणार असले, तरी त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. सर्किटमध्ये विजेंदर सध्या अपराजित असून,  ब्रिटिश ट्रेनर ली बियर्ड यांच्या मार्गदर्शनात मँचेंस्टरमध्ये सराव करीत आहे. जुल्फिकारविरूद्ध होणारी लढत विजेंदरची भारतातील तिसरी लढत विजेंदरची भारतातील तिसरी लढत असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गर्दी सांगते ही विजयाची सभा - राज ठाकरे