Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सानिया, बोपन्नाची तिसऱ्या फेरीत धडक

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सानिया, बोपन्नाची तिसऱ्या फेरीत धडक
, सोमवार, 10 जुलै 2017 (09:16 IST)
अग्रमानांकित फेडरर, जोकोविचचा सहज विजय
 
लंडन – विम्बल्डन-2017 स्पर्धेतील महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झाने दमदार कामगिरी करत तिसऱ्या फेरीत स्थान निश्‍चित केले आहे. तसेच भारताच्या युवा खेळाडू रोहन बोपन्ना आणि पुरव राजा यांनीही आपल्या जोडीदारांसह मिश्र दुहेरीत विजय मिळवित आगेकूच कायम ठेवली आहे. तिसऱ्या फेरीत सहज विजय मिळवित अग्रमानांकित नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरने चौथ्या फेरीत धडक मारली आहे.
 
मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डोडिग या चौथ्या मानांकित जोडीने जपानच्या युसुके वातानुकी आणि मकोतो निमोमिया या जोडीचा सुमारे 1 तास 18 मिनीटे रंगलेल्या सामन्यात 7-6, 6-2 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीचा पुढील सामना गजविजेत्या हॅनरी कोंटीनेन आणि हीथर वॉटसन यांच्याशी होणार आहे.
 
महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि बेल्जियमच्या कर्सटन फ्लिपकेंस या जोडीने नाओमी ब्राडी आणि हिथर वॉटसन या जोडीला पराभूत करत विजयी आगेकूच केली. या जोडीने 1 तास 45 मिनीटे झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात 6-3, 3-6, 6-4 असा विजय मिळविला. भारत-बेल्जियमच्या या जोडीचा पुढील फेरीत स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस आणि युंग यान चेन यांच्याशी सामना होणार आहे.
 
मिश्र दुहेरीत भारताच्या पुरव राजा आणि जपानच्या ऍरि होजुमी या जोडीने पहिल्या फेरीत जेम्स कारेटानी आणि रेनाटा व्होराकावा या जोडीचा 5-7, 6-4, 6-2 असा पराभव केला. पुरव-होजुमी यांचा पुढील फेरीत डॅनियल नेस्टर आणि आंद्रिया क्‍लेपाक या अकराव्या मानांकित जोडीशी सामना होणआर आहे.
 
फ्रेंच ओपन जिंकलेल्या रोहन बोपन्ना आणि गॅब्रिएला दाब्रोवस्की यांनी मिश्र दुहेरीत आगेकूच कायम ठेवली आहे. भारत-कॅनडाच्या दहाव्या मानांकित जोडीने फ्रान्सच्या फॅब्रिस माटर्नी आइण रोमानियाच्या रालुका ओलारू या जोडीला पराभूत करत तिसऱ्या फेरीत धडक मारली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयडीया कॉलेज आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्टचा वाद अखेर शिक्षणमंत्र्यांनी सोडवला महाविद्यालय प्रवेशाचा प्रश्न