टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलेला कुस्तीपटू दीपक पुनिया याच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. दीपक आणि सुजित कलकल यांना आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मान्यता मिळालेली नाही. हे दोन्ही पैलवान मंगळवारपासून दुबई विमानतळावर अडकून पडले होते आणि शुक्रवारी ते बिश्केकला पोहोचले. हे दोन भारतीय कुस्तीगीर तिथे पोहोचेपर्यंत इतर कुस्तीपटूंचे वजन तपासणे सुरू झाले होते, त्यानंतर आयोजकांनी दीपक आणि सुजीतला मान्यता देण्यास नकार दिला.
आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत खेळण्याची परवानगी न मिळाल्याने दीपक आणि सुजीतला पात्र ठरण्याची आणखी एक संधी मिळाली. दीपक आणि सुजीतला पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक पात्रता फेरीदरम्यान पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची आणखी एक संधी आहे. भारताच्या पात्रता मोहिमेची सुरुवात पुरुषांच्या फ्रीस्टाइल लढतीने होईल. दीपक पुनियाच्या अनुपस्थितीत, युवा कुस्तीपटू अमन शेरावत 57 किलो गटात पुरुष संघाचे नेतृत्व करेल. ते मुसळधार पावसामुळे दुबई विमानतळावर अडकले.विलंबामुळे हे दोन्ही भारतीय कुस्तीपटू वेळेवर बिश्केकला पोहोचू शकले नाहीत.