भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनातच लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये सायना नेहवालने कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर यंदा रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनची नवी फुलराणी पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक जिंकून देशाची शान वाढविली. याबाबत पुलेला गोपीचंद यांना अभिमान आहे की, त्यांच्या मार्गदर्शनात देशाला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके मिळाली. विशेष म्हणजे आपले राहते घर गहाण ठेवून गोपीचंद यांनी अँकॅडमी खोलली.
16 नोव्हेंबर 1973 रोजी आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यात नगन्दला येथे जन्मलेल्या पुलेला गोपीचंद हे वयाच्या 10 व्या वर्षापासून बॅमिंटन खेळण्यास सुरुवात करणारे भारतातील प्रसिद्ध बॅमिंटन खेळाडू आहेत. 2001 मध्ये चीनच्या चेन होंगला फायनलमध्ये गोपीचंद यांनी हरवून चम्पियनशिप जिंकून इतिहास रचला होता.
त्यानंतर 2001 मध्ये गोपीचंद यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर दुखापतीमुळे तंनी राष्ट्रीय स्तरावर खेळणे बंद केले. गोपीचंद यांनी त्यानंतर आपली बॅमिंटन अँकॅडमी खोलली व प्रशिक्षकाच्या रुपात अनेक खेळाडूंना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला. अँकॅडमी सुरू करण्यासाठी गोपीचंद यांना आपल्या राहते घरही गहाण ठेवावे लागले होते.
दरम्यान आंध्र प्रदेश सरकारने त्यांना अँकॅडमी खोलण्यासाठी जमीन दिली होती. परंतु प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र त्यांनी हार न मानता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले घर गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. 2005 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये पद्मभूषण त्याचबरोबर द्रोणाचार्य पुरस्कारानेही तंना गौरविण्यात आले आहे. गोपीचंद यांनी केवळ सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनाच नाही तर श्रीकांत किदांबी, पी कश्यप, गुरुसाई दत्त, तरुण कोना या सारख्या अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे.