Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक अधुरी कहाणीः इश्मीत

श्रध्‍दांजली

एक अधुरी कहाणीः इश्मीत

वेबदुनिया

PR
इश्मीत सिंगची नोव्‍हेंबर 2007 मध्‍ये जेव्‍हा व्‍हॉइस ऑफ इंडिया म्‍हणून निवड झाली. कुणी त्‍याच्‍या अकाली जाण्‍याबददल कधी विचारही केला नव्‍हता. त्‍याच्‍या जाण्‍याने सर्वांच्‍याच डोळयासमोर 24 नोव्‍हेंबरचया रात्रीची ती खेळकर स्‍पर्धा नककीच आली असेल. हर्षित आणि इश्मित दोघांमध्‍ये झालेला या अंतिम सामन्‍यातून एकाची निवड केली केली जाणार होती. आणि निवड करणार होत्‍या स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर. त्‍यांच्‍या हस्‍ते इश्मीतचा सन्‍मान करण्‍यात आला.

आपले निरागस हास्‍य आणि सुमधुर आवाजामुळे इश्मीतला लोकांचा पाठिंबा मिळाला आणि इश्‍मीत विजेता ठरला. लता मंगेशकर यांच्‍या हस्‍ते इश्‍मीतला ट्रॉफी देताना त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या, की मला खात्री आहे, इश्मीत खूप मोठा होईल. मात्र आज ही सर्व स्‍वप्‍ने अर्धवटच राहिली.

इश्‍मीतचा योजनाबध्‍द विजय

webdunia
PR
इश्मीत ‘व्‍हॉइस ऑफ इंडिया’च्‍या अंतिम सामन्‍यात पोचल्‍यानंतर त्‍याच्‍या गावचे लुधियानातील लोक प्रचंड खुशीत होते. त्‍यांनी नियोजनबध्‍द रित्‍या प्रयत्‍न करून इश्‍मीतसाठी मतेही जमविली. त्‍यासाठी इश्‍मीतचे काका चरणकमलसिंह यांनी एक अभियानच चालविले होते. इश्मीतच्‍या आवाजाचे अनेक जण दीवाणे होते आणि इश्मीतला त्‍याचा फायदाही मिळाला. वीस वर्ष वयाच्‍या या गायकाकडून त्‍याच्‍या चाहत्‍यांना ब-याच अपेक्षा होत्‍या. त्‍याला त्‍या दृष्‍टीने यशही मिळू लागले होते.

इश्मीत कुठलेही गाणे सहज गाउ शकत होता. असे अनेकदा पाहण्‍यात आले आहे, की रिएलिटी शो जिंकल्‍यानंतर विजेत्‍यास भरपूर संघर्ष करावा लागतो. असे अनेक विजेते यापूर्वी विस्‍मरणात गेले आहेत. मात्र इश्‍मीत त्‍यात लकी ठरला त्‍याचे अनेक जणांशी बोलणे चालले होते, आणि
लवकरच आपल्‍या आयुष्‍यात एक मोठी संधी चालून येणार असल्‍याचेही ते सांगत असे.

संगीत जगतात शो

webdunia
PR
इश्मीतच्‍या अकाली जाण्‍याचे वृत्‍त ज्‍याने कुणी ऐकले त्‍याचा त्‍यावर सुरुवातीला विश्‍वासच बसला नाही. त्‍याच्‍या जाण्‍याबददल अनेक नामांकित संगीतकार आणि गायकांनी दुःख व्‍यक्‍त केले आहे. भारतीय संगीताच्‍या आसमंतातील एक उदयोन्‍मुख गायक आणि एक सुरेल आवाजाचा जादूगार आपल्‍यातून अकाली निघून गेला आहे. त्‍याच्‍या अचानक जाण्‍याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi