Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जया बच्चन - निरागसता आणि ग्लॅमरचे मिश्रण

जया बच्चन - निरागसता आणि ग्लॅमरचे मिश्रण
IFM
शर्मिला टॅगोर, मुमताज आणि हेमा मालिनी सारख्या ताकदीच्या नायिका पडदा गाजवत असताना जया भादुड़ी या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. सत्तरच्या शतकात सर्वसामान्य, नाकासमोर चालणा-या मुलीला ग्लॅमरच्या जगात पाय रोवणे कठीण होते. पण, जया बादुरी यांचा साधेपणा, निरागसता प्रेक्षकांना एवढा भावला की बस्स.. आपल्या शेजारी रहाणा-या मुलीबद्दल जशी आत्मियता असते तशीच त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली.

जया भादुरी यांना सर्वप्रथम बंगाली निर्माते सत्यजीत रे यांनी 'महानगर' या चित्रपटात संधी दिली. यापूर्वी भारतीय फिल्म एंड टेलीव्हिजन फिल्म इंस्टीट्यूटच्या 'सुमन’ या चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम कॅमे-याचा सामना केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांचा सहकारी मित्र मदन बावरिया हे होते. जया यांनी कॅमे-यासमोर इतक्या सहजतेने अभिनय केली की मुंबईतील निर्माता-दिग्दर्शकही त्यांची वाहवा केली.

ऋषिकेश मुखर्जी यांनी 'सुमन' मध्ये त्यांचा अभिनय पाहिला आणि आपल्या 'गुड्डी' या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थिनीची भूमिका दिली. 'गुड्डी' चित्रपटही गाजला आणि जया यांना लागलीच राजश्री प्रोडक्शनचा की फिल्म ‘उपहार' या‍ चित्रपटाची नायिका बनण्याची संधी मिळाली. पारंपारीक पेहराव, सामान्य वागण्याने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

अत्यंत कुशलतेने आपल्या इमेजमध्ये बदल केला आणि पिया का घर, अनामिका, परिचय, कोरा कागज, अभिमान, मिली, कोशिश सारखे उत्तम चित्रपट केले. ताकदीची अभिनेत्री म्हणून ओळख झाल्यावर त्यांच्यासमवेत काम करताना भलेभले कलाकरही घाबरत असत. अमिताभ बच्चन आणि संजीवकुमार यांच्याबरोबर त्यांनी अधिक काम केले.

पडद्यावर जवळ येणा-या अमिताभ-जया वास्तविक जीवनातही जवळ येऊ लागले आणि एकदिवस त्यांनी लग्न केले. शबाना आजमी, स्मिता पाटील, दिप्ती नवल यांच्याबरोबरीने जया यांचे नाव घेतले जायचे आणि अमिताभ यांची पत्नी म्हणून त्यांचा लौकिक अधिकच वाढला. लग्नानंतर त्या संसारात रमून गेल्या. अमिताभ यांना सुपर स्टार म्हणून लौकिक मिळवून देण्यासाठी त्यांनी चित्रपटात काम करण्याचे थांबवून त्यांना आधार दिला.

अभिषेकचा जन्म त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. सुन म्हणून ऐश्वर्याला गृह प्रवेश या सगळ्या घटना घडत असताना त्यांनी कधीच उलटसुलट चर्चा घडून दिल्या नाहीत. आज बच्चन परिवार जगातील ग्लॅमरस, प्रसिद्ध आणि श्रीमंत परिवार आहे. त्यांचे कुटूंब सुपरस्टार असले तरी त्यामागे जया बच्चन यांचे मोठे योगदान आहे, हे सर्वज्ञात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi